Saturday, 15 January 2022

आजी

देह सुकतो, झुकतो, वाकतो
कालांतराने
तशी तू थकत गेलीस
नियतीचं 
बोजड ओझं 
असहायपणे वाहताना

अन सलत गेलं 
तुझं नव्या दमाचं स्त्रीपण
अनेकांच्या डोळ्यात
तू वय मानाने
झुकत असतानाही

खुपत गेली 
एक-एक गोष्ट 
तुझ्यातील बाईपणाच्या 
अनाम अस्तित्वाला
हळुवारपणे धार देऊ पाहणारी

आटत गेला
सग्या सोयऱ्यांचा 
ऐनवेळी अनाहूतपणे 
उफाळून येणारा
लहरी पाझर 
तुझ्यामधील खम्बीरपणा
उत्तरोत्तर उन्नत होताना बघून

तरीही सुलगत गेली
तुझ्या तप्त सरणातून
एक उबदार अनामिक ठिणगी
तुझ्यातील निर्व्याज मायेला
कोरे करकरीत
ठेऊ पाहणारी

आता तुला मरण नाही
तू गेलीस इथल्या
धुलीकणात
तुझ्या स्त्रीत्वाच्या
अभिजात जाणिवेचे
ठसे उमटवून


निरज पुरुषोत्तम चौधरी
14/01/2022l

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...