कुणी थाटले नाजूकसे घर
किमया काय म्हणावी त्याची
कोण म्हणावा किती कलन्दर
तातुर-मातुर कुठले काही
चोख विनाई चोख शिलाई
चोख म्हणावे ऐसे सगळे
चोख बांधणी चोख छटाई
मिनाकार ते चम्बूक लांबुक
वरती साजे अखंड मिन्मुक
कुणी पहावी तिचि हुशारी
कोण बोलवा कुठला दर्शक
पण नवलाई असे एकटे
सोबत काही काटे गोटे
"सुगरण भारी किमयागारी"
डोलुन म्हणती बाभूळ फाटे
रान तरी येतसे खावया
एकट दुकट उचलत भिवया
जरी गोजिरे दिसते सारे
कुणी कला हि नसे पहाया
निरज पुरुषोत्तम चौधरी
जानेवारी, २०१९
अमरावती, महाराष्ट्र