Thursday, 17 April 2025

देव



गेली करपून मनीची पणती
ठिणगी कोणती सुलगेना

देवळात देव मांडला दगडी
खेळूनी फुगडी विश्वासाची 

उभे मारेकरी दैवत राखन्या 
दंभाच्या पिपाण्या वाजवित 

श्रद्धावंत सारे डोळस गाभारी 
जरी घरोघरी अधांरचि 

कुणाला भेटतो कोण भक्ती भावे
बगळ्यांचे थवे सर्व इथे

मानावा कसा मी थोपलेला देव
येडा मुका भाव आम्हाठाई

शोधता भेटलं अंतरीच राम
नको तो सलाम राऊळीचा 

नीरज पुरुषोत्तम चौधरी 
१८ एप्रिल २०२५
दमण 

Thursday, 10 April 2025

गावं

निरभ्र इथल्या आकाशाची
चंद्र एकटा गातो गाणी
शुभ्र चांदणे लपून बसावे
अशी भासते स्तब्ध विराणी

नदी एकटी, नाव एकटी
गाव एकटे पडले सारे
विरक्त इथला माळ बघुनि
मणी दाटती कैक शहारे 

थकली बाभूळ पिंपळ थकला 
थकून गेला शेत- शिवार
दूरस्थ झुकल्या निवडुंगावर 
मळभ दाटली पूर्वापार 

एकलकोंडा अनिल आर्तही
बसून बघतो वाट कुणाची
मनुष्य वस्ती अजूनही खडतर 
कात टाकते अंधाराची

दूर फुलांच्या दडून बसते
याजागीचे भ्रमर भामटे
कणभर इथल्या वसुधे वरती
टपून बसले किती चोरटे

वेशीवरुणी स्पष्ट जाणवे 
या गावीचे असे रितेपण
क्षीण जाहल्या गावकुसाचे 
अविरत चाले अरुण्यरुदन 


नीरज पु. चौधरी 
01/04/2025
दमण 



Manhandling

The world 
That manhandles everything 
Is the world broken and cowardly 

One day 
It will manhandle me too
For saying 
What I've said 
Just now

That's the day
I stay silent 
And grow subtle 

My silence is 
A form of protest
The world doesn't know 

The world doesn't know 
Poetry 
Without words

Niraj P. Chaudhari
10/04/2025
Daman 


मेरा गाँव

बरसों पहले
मैं उस गाँव को छोड़ आया

वो गाँव, जो मेरे प्यार के गुनहगारों में शामिल है,
भूल चुका है मुझे

मैं कैसे भूल जाऊँ ऐसा गाँव,
जिसने मेरा लड़कपन देखा

वो गाँव...
मेरा पहला-पहला प्यार था

नीरज पु. चौधरी 
दमण, 10/04/2025


Saturday, 5 April 2025

माणसा

माणसा

माणसा, तू डोळे बंद कर
अन् पसरू दे गु सर्वत्र
रड "माणुसकी झवून निघालीय"

छाटलेल्या मानवी तुकड्यांचा सडा शिंपड.
"इथे फुलतोय पुच्यांचा बगीच्या"असे गात बैस.

तुझं मार्दव्य एकत्र कर अन् ते तुझ्या ढुंगणात घाल
किंवा बाहेर काढून मिरवत रहा नको त्या कारणास्तव 

पण लक्षात ठेव, 
जर तू भांडला नाहीस
नसेल कुठेच कुठला प्रकाश
अंधारच अंधार धरतीपल्याड 
गिळून टाकेल लेविएथन सर्वकाही

नीरज पुरुषोत्तम चौधरी
05/04/2025
दमण 

Man

Man

Man, you close your eyes
And let any shit spread all over
Cry " humanity is all fucked up".

Scatter the pieces of your castrated humane
Sing, "Here grows the garden of pussies"

Collect your manhood and shove it up your ass 
Or take it out and flaunt it for no reason 

But know, if you don't fight,
" There won't be any light"
Darkness will outgrow the land
And  everything will be devoured by the Leviathan.

Man, it's your last chance to be a man.

05/04/2025
Daman


माणसा

माणसा, तू डोळे बंद कर
अन् पसरू दे गु सर्वत्र
रड "माणुसकी झवून निघालीय"

छाटलेल्या मानवी तुकड्यांचा सडा शिंपड.
"इथे फुलतोय पुच्यांचा बगीच्या"असे गात बैस.

तुझं मार्दव्य एकत्र कर अन् ते तुझ्या ढुंगणात घाल
किंवा बाहेर काढून मिरवत रहा नको त्या कारणास्तव 

पण लक्षात ठेव, 
जर तू भांडला नाहीस
नसेल कुठेच कुठला प्रकाश
अंधारच अंधार धरतीपल्याड 
अन् गिळून टाकेल लेविएथन सर्वकाही

05/04/2025
दमण 
















घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...