Niraj Chaudhari's Page
Pretender... Pretends to be a part-time poet and researcher. He works as an Assistant Professor of English at Government College, Daman.
Tuesday, 16 December 2025
घर
Wednesday, 18 June 2025
आज तुम्हारा होना जरूरी है
Thursday, 17 April 2025
देव
Thursday, 10 April 2025
गावं
Manhandling
मेरा गाँव
Saturday, 5 April 2025
माणसा
Man
Monday, 29 August 2022
थेरड्याचे प्रेमगीत
Monday, 28 March 2022
गझल
Thursday, 17 March 2022
कवी झोपत नसतो
Tuesday, 15 February 2022
Woman
Tuesday, 8 February 2022
Lover's Dilemma
How can I do this right? How can I express this feeling? I just feel it. I feel it like a volcano erupting through a burning mountain. It comes from the depth of millions of emotions that are preserved in my heart like the wine that is stored in the womb of the earth for centuries. This love is like a heady storm, I want it to be my destiny. There is no feeling that I feel and never feel for you. There is no breath I breathe and never breath for you. My heart! My heart! It is sick and on its pick of love, like Florentino Ariza in Love in the Time of Cholera.
Saturday, 15 January 2022
आजी
Wednesday, 15 December 2021
Love and All
Belief
Saturday, 20 November 2021
उडाण: सूर्याचे गाणे
Flight: Surya's Song
Thursday, 11 November 2021
Love
Friday, 1 October 2021
बापू
Sunday, 19 September 2021
शोध
Friday, 17 September 2021
पारवा
Monday, 19 July 2021
Transformation
Tuesday, 29 June 2021
फतवा
विस्तार
प्रश्न
सिसिफस
अभंग
Fuck
Monday, 28 June 2021
संन्यस्त
आम्ही दगडाचे वंशज
आम्ही
बिनदिक्कत तिला रांडेचे
संबोधन दिले,
अन हळू हळू
मरत गेला तिच्या आतला
माणूस...
आता पुरुषाने कसेही दामटले
तरी तिला फरक पडत नाही,
किंवा होत नाही तिची दमछाक,
घरेलू अन घरंदाज स्त्रीची
होते तशी..
स्त्रीत्वाची
अखंड पुटे असलेलं
तिचं कोवळं देहालय
आतून-बाहेरून होत चाललंय
डांबरासारखं निबर...
मनाचा ठाव घेणं,
त्याहून कठीण,
हौशी पुरुषार्थाचे असंख्य दणके झेलून
ते होऊन गेलयं,
वज्रासारखं
टणक...
एवढे असून सुद्धा
आमच्या प्रत्येक ढुश्श्या गणिक
आजही चुळबुळतोच एखादा अव्यक्त तरंग,
तिच्या अनासक्त डोळ्यांमधुन....
आम्ही मात्र
दगडाचे वंशज,
आमच्या रक्तात पाझर नाहीच
आम्हाला कधीच वरसोस होत नाही
कुणाची अस्वस्थ अवस्था
पाहून...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
27/03/17
फोटो
तिच्या फोटोसाठी बघा
किती आटा-पिटा होतो
फोटो मिळेना तोवरी
राग खोटा खोटा येतो...
राग लटका घडीचा
तरी डोळेझाक होते
आठवांच्या पल्याडून
मग आर्त हाक येते...
असा फोटोसाठी कोणी
कसा करलं तांडव
तिच्या फोटोमधी उभा
त्यांच्या स्वप्नीचा मांडव...
त्यांच्या स्वप्नीचा मांडव
तिला कळून चुकले
जाणिवेच्या तळाखाली
किती अंदाज हुकले..
असे अंदाज हुकता
चुकतात किती वाटा
सल येते काळजात
ह्रदयात येतो काटा...
असा हृदयीचा काटा
फार विखारी जालीम
दुःख खोलवर द्यावे
त्याला असते तालीम...
त्याला असते तालीम
असा घुमला आवाज
किती फोटोमधी मीही
केला होता गडे साज...
त्याच्या नजरेने तीन
जेव्हा फोटो बघितला
ओलं चढली लोचनी
देह चिंब- चिंब झाला...
देह चिंब चिंब झाला
पाझरली आठवण
किती विकल मनाने
केली होती पाठवणं...
पाठवणं ती पाळीव
असे खुणावते काही
कळ उठते उरात
मचतसे त्राही त्राही...
असा होयी त्राहिमाम
वेडावल्या काळजाचा
हरएक आठवण
परिमळ कापराचा...
येई कापराचा गंध
किती नितळ जाणीव
फोटो पाठव तुझ्यात
नच कोणती उणीव...
नसे कोणती उणीव
तिच्या पल्याडते गाव
होई सुरू कुजबुज
असा तरल तो भाव...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
०३/०१/२०२०
प्रश्न (गझल)
प्रश्न?
(गझल)
केव्हा कोठे काय भासते कुणास सांगू?
पाण्यावरही साय भासते कुणास सांगू?
उजेड त्यांनी सदनी त्यांच्या चोरून नेला
अंधाराला पाय भासते कुणास सांगू?
आभाळाचे ऋतु दर ऋतु ईमले केले
ऋतू असा अन्याय भासते कुणास सांगू?
ह्या जागीचा हक्क कसा सोडावा आम्ही
इथली माती माय भासते कुणास सांगू?
सन्मानाला खुद्द तयांनी विकले त्यांच्या
जन्म असा बोन्साय भासते कुणास सांगू?
आधाराला एक जीव तळमळतो तेव्हा
देश उभा असहाय भासते कुणास सांगू?
नीरज पुरुषोत्तम चौधरी
दि. २७.०६. २०२१
वेळ. रात्री: १०:८ मिनिटांनी
जेव्हा मला कविता स्फुरते
मी जेव्हा कवी होतो
शब्दांसोबत न्हाऊन घेतो
हवा तेवढा भग्न होतो
आत बाहेर नग्न होतो
मी भिरकावून देतो
आदीमतेची आशाळभूत लक्तरे
जेव्हा मला कविता स्फुरते
तेव्हा माझा बुद्ध होतो
नीरज पुरुषोत्तम चौधरी
12/06/2021
चकवा
विरघळलेल्या ओठावरती
शोधीत तुझिया गाणे
चकवा येतो मनात माझ्या
अन स्वप्नांचे दाणे..
पेरून पाहीन स्वप्न गोजिरे
किन-किनला तंबोरा
सूर निघाले नाही त्यातून
तणतण तुटल्या तारा..
विस्कटलेल्या केसांवरती
उठला नंतर हात
बा गाण्याने कात टाकली
सूर निघाले सात..
कुस्करलेला देह पाहुनी
तीळ तीळ तुटले अंग
हाय तुला हे प्रेम वाटले
जुळला थेट अभंग..
अभंग कसला तळमळ आतील
हृदयची गारद झाले
गाणे कसले पीळ मनाचा
दुःख गर्जूनी गेले..
दुःख गर्जता कातर झाला
तूझा काजळी सूर
या मेघांनो बरसून जा रे
भरून येता ऊर..
नीरज पुरुषोत्तम चौधरी
मु.पो. चिंचमंडळ
ता. मारेगाव जि. यवतमाळ
मो.नं. ७०६६१२२९६२
आडोसा
बलुन
Tangling
Curfew
ती आणि पहिला पाऊस
घर
चिमुकल्याश्या फांदीवरती कुणी थाटले नाजूकसे घर किमया काय म्हणावी त्याची कोण म्हणावा किती कलन्दर तातुर-मातुर कुठले काही चोख विनाई चोख शिल...
-
देह सुकतो, झुकतो, वाकतो कालांतराने तशी तू थकत गेलीस नियतीचं बोजड ओझं असहायपणे वाहताना अन सलत गेलं तुझं नव्या दमाचं स्त्रीपण अनेकांच्या डो...
-
Subtle setting sun sickens me With his daily slumber. Light passes, and darkness prowls behind me Carrying thousands of needles. A sudden gu...
-
रोज एक बात कहनी होती है रोज एक बात अधूरी रहती है रोज वक़्त बीत जाता है, रोज लम्हा गुज़र जाता है, रोज इस रोज़ से तंग आकर रोज उस रोज़ से आस रख...