नुस्ता भीजल्याचा भास होऊ लागताच
माझ्या सर्वांगाची होतात लक्षावधी हातं
अन् लागतात तुला लगडू
वाटतं राहातं
पहिल्यांदाच होऊ लागलय
वर्षानुवर्ष घडत आलेल्या समागमाच
असं प्रखर प्रदीर्घ सेंसेशन
माझी वाकलेली बोट
तुझ्या सुकलेल्या अधर फुलांवरून
हळुवार चाळवताना
भरू पाहतात
पिढ्यान् पिढ्या फसत गेलेल्या
प्रणयाची उत्कट प्रचारसभा
फाटक्या लक्तरांना
परत परत रफू मारल्यागत झालेली
तुझी गलीत गात्र त्वचा
जिच्या रंध्रातून ओसंडत राहतो
ब्रम्हानंदाचा अस्फुट अदृश्य झरा
तुझे बुरसटलेले स्तन कुरवाळताना
मला आठवतो नशिबाने कुरतडलेला
माझा कासाविस चंद्र
मला खुणावत राहतो आतल्याआत
नैतिकतेच्या दडपणाखाली दबून गेलेला
बायबलिकल सर्प
मानव जातीच्या अधपतनाचा साक्षीदार
शतकानुशतके
नीरज पुरुषोत्तम चौधरी
दि. ३० ऑगस्ट २०२२
When I hallucinate
Your sluggish body
Having moisture,
All my limbs turn into millions of hands
And start fondling you with craze,
I keep on feeling as if for the first time I'm having long and intensive sensation of the intercourse that has been happening for the centuries.
My bent fingers
running over your parched lips,
Try to fill the congregation
Of the the romance that has been failing for ages.
Your skin
which looks like a tattered cloth,
knitted at the same place again and again
From her pores flows the stream of ecstasy unknown, unseen.
When I caress
Your fungal-smeared breasts
I remember my agitated moon,
gnawed By the fate
That biblical snake,
Who is suppressed under the burden of morality
The witness of the degeneration of human race for centuries,
Lures me unconsciously
तुम्हारा थका हुआ अंग
अचानक भिगनेका भ्रम होतेही
मेरा पुरा शरीर होता हैं तबदील
हजारो हाथोमे
औंर लगता हैं तुम्हे मसलने
लगता रहता हैं
पेहली बार हो रहा हैं
सालोसाल हो रहे