Monday, 28 June 2021

संन्यस्त

कुठल्याश्या 
अवखळ प्रवाहात 
वाहवत जातांना
तू थोपवून धरतेस मला
अन आपण देऊ लागतो
आपल्या मर्म कोषांना
आपणास हवा असलेला 
आकार...

विचारांची अथांग गर्दी
मनात कोलाहल करत असताना
तुझ्या अनाम स्पर्शाने
दिलेली खूण
मला अजूनही
सगळ्यात जास्त ओळखीची वाटते
ती म्हणूनच...

गतकाळातील
आठवणींचे ठसे
धूसर होऊ लागल्याने
मनाच्या तळघरात
साचूलागलीय मनमुक्त काजळी,
तरीही तुझी आठवण
नववधूच्या नवथरेसारखी
नूतन भासतेय 
ती त्यामुळेच...

तुला तुझ्या पठडीत राहून
मनसोक्त होताच आलं नाही
कधी,
तरीसुद्धा,
तुझा स्वानंद टिकवून ठेवण्याचा
तू करते आहेस
काठोकाठ प्रयत्न...

प्रेमाने बहरलेल्या
अशा अजस्त्र वृक्षाखाली
मी अजूनही 
एक सन्यस्त म्हणूनच वावरतोय
हे मात्र खरोखरचे
नवल...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
20/4/2017

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...