चंद्र एकटा गातो गाणी
शुभ्र चांदणे लपून बसावे
अशी भासते स्तब्ध विराणी
नदी एकटी, नाव एकटी
गाव एकटे पडले सारे
विरक्त इथला माळ बघुनि
मणी दाटती कैक शहारे
थकली बाभूळ पिंपळ थकला
थकून गेला शेत- शिवार
दूरस्थ झुकल्या निवडुंगावर
मळभ दाटली पूर्वापार
एकलकोंडा अनिल आर्तही
बसून बघतो वाट कुणाची
मनुष्य वस्ती अजूनही खडतर
कात टाकते अंधाराची
दूर फुलांच्या दडून बसते
याजागीचे भ्रमर भामटे
कणभर इथल्या वसुधे वरती
टपून बसले किती चोरटे
वेशीवरुणी स्पष्ट जाणवे
या गावीचे असे रितेपण
क्षीण जाहल्या गावकुसाचे
अविरत चाले अरुण्यरुदन
नीरज पु. चौधरी
01/04/2025
दमण
No comments:
Post a Comment