Wednesday, 16 October 2019

व्यवहार

व्यवहार

उजाडताही भकास भासे
जगणे ऐसे निर्जण झाले
सूर्य बुडीच्या संध्यावेळी
सुख बेगडी फुलून आले...

दर्पणातही सरपण यावे
उसने-वारी घरपण यावे
खुळी वावटळ यावी तैसे
फिल्मीवारे बहरून आले...

देठ मनाचे गवसत नाही
बोलून सुटतो काही-बाही
त्यांची तर सुरुवात व्हायची
म्हणे "तयांचे बोलून झाले"...

तळहातावर तुरी द्यायचा
धंदा हुकमी अन न्यायचा
व्यवहाराच्या नावाखाली
झापड बांधून दुनिया चाले...

असे कसे दिक्काल चालले
तरणे-ताठे सारे भुलले
चार चांदण्यांच्या दिमतीला
लक्ख काजवे उडून गेले...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
16/02/2017

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...