तुझा
अत्तराच्या कुपीत साठवून ठेवलेला सुगंध
माझ्यासाठी नामानिराळा.
माझा जन्म उकिरड्यातला
मला येत असतो दर्प,
मला माती भावते,
अन चप्पल चावते,
मला नाही फुलांची सवय
जी पाहिली, ती होती उकिरड्यातलीच
मी तुझ्या सालस जगाचा उपकृत आहो.
त्याने मला स्वप्नं दिलीत,
नाहीतर माझे सुद्धा झाले असते
उकिरड्यामध्ये रूपांतर.
मी कोमेजलो असतो...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
12/06/2021
No comments:
Post a Comment