अंधाराच्या आडोश्याला
दडवून ठेऊ पाचू
लख्ख होऊनि त्या जागेवर
आपण दोघे साचू
साचून बसलेल्या जागेवर
उकलत विकल विराणी
सजल मनाने गाऊ तिथल्या
आषाढाची गाणी
गाण्यांमधले सूर बिलगतील
उत्फुल्ल होईल अंग
गद्य तनूचे अस्तर होईल
उठतील त्यावर रंग
रंग उतरता उरकून घेऊ
भावफुलांची होळी
क्षितिजावरती स्वानंदाने
सजवीत कातरवेळी
कातरवेळी मस्त मनोहर
स्वप्न उद्याचे पाहू
ज्या मातीला प्रीत उमगली
तिथेच जन्मत राहू
नीरज पुरुषोत्तम चौधरी
13/06/2021
सकाळी: 7:50
No comments:
Post a Comment