अता घोकतो मी
तुझा एक पाढा
तयांनी गराडा
घालू नये...
तुझ्या सोबतीला
बरा तूच देवा
पुन्हा काय ठेवा
ठेवायचा...
तुझ्या तूच भिंती
तुझी तूच कांती
बरी हि महंती
दगडाची...
कसा काय देवा
तुझा तू सम्पूर्ण
सावळासा वर्ण
तुझा तरी...
तुझी चार नाती
तुझी चार गोती
तुझी काय ख्याती
धोंडोराया...
आम्हा माणसाचा
असा काय गुन्हा
आम्हालाच चुना
कशापायी...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
26/11/2016
No comments:
Post a Comment