Monday, 28 June 2021

ती आणि पहिला पाऊस



वळचणीच्या नेटाशी येऊन
तू ओलं करून जातोस अर्धवट
मग मी बरसत सुटते 
अहोरात्र, दिवसेंदिवस
वर्षानुवर्ष...
तुझ्या आठवांच्या
कित्तेक सरी येतात
अन जातात
निघून
तू मात्र कधीच येत नाहीस
तेव्हा आलास तसा...

18/06/2021
10:00 वाजता..
नीरज पुरुषोत्तम चौधरी


She and the First Rain

Brushing against the eaves
You leave me half wet
Then I start raining
Night after night
Day after day
Year after year...
Drizzles of your memory
Come and go away
But you never come
The way you came that day

Translation
Niraj P. Chaudhari 

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...