Monday, 28 June 2021

गुलाम

नियतीच्या नावावर
जेव्हा खपवून घेतला
पिढ्यान-पिढ्या पोखरत जाणारा 
कालातीत अंधार,
मी गुलाम तेव्हा झालो...

मी गुलाम तेव्हा झालो
जेव्हा जेव्हा समंजस झालो.
आधी तू मला समंजस केलेस...

नीरज पुरुषोत्तम चौधरी
12/06/2021

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...