Monday, 28 June 2021

जेव्हा मला कविता स्फुरते

मी जेव्हा कवी होतो

शब्दांसोबत न्हाऊन घेतो

हवा तेवढा भग्न होतो

आत बाहेर नग्न होतो


मी भिरकावून देतो

आदीमतेची आशाळभूत लक्तरे

जेव्हा मला कविता स्फुरते

तेव्हा माझा बुद्ध होतो


नीरज पुरुषोत्तम चौधरी

12/06/2021

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...