प्रश्न?
(गझल)
केव्हा कोठे काय भासते कुणास सांगू?
पाण्यावरही साय भासते कुणास सांगू?
उजेड त्यांनी सदनी त्यांच्या चोरून नेला
अंधाराला पाय भासते कुणास सांगू?
आभाळाचे ऋतु दर ऋतु ईमले केले
ऋतू असा अन्याय भासते कुणास सांगू?
ह्या जागीचा हक्क कसा सोडावा आम्ही
इथली माती माय भासते कुणास सांगू?
सन्मानाला खुद्द तयांनी विकले त्यांच्या
जन्म असा बोन्साय भासते कुणास सांगू?
आधाराला एक जीव तळमळतो तेव्हा
देश उभा असहाय भासते कुणास सांगू?
नीरज पुरुषोत्तम चौधरी
दि. २७.०६. २०२१
वेळ. रात्री: १०:८ मिनिटांनी
No comments:
Post a Comment