Thursday, 17 March 2022

कवी झोपत नसतो

कवी कधी झोपत नसतो
तो झुलत असतो 
सृजनाच्या सख्त वेलीवर
ईथल्या सालस जाणिवांच देठ धरून 
तो करत असतो 
शब्दांचा पाळणा
कवितेचा झोका
अन आशयाची अंगाई
तिचा शाकार सर्वदूर जावा म्हणून
कवी निद्रेच्या तळागाळात
सुद्धा पेरत असतो निर्मितीच बीज
आपल्या अस्तित्वाची पाळ मूळ खोलवर रोवण्यासाठी

निरज पुरुषोत्तम चौधरी
17/03/2022

3 comments:

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...