Wednesday, 16 October 2019

मृत्यस

मृत्यूस

तू शिरजोर ठरलास,
तरी हरकत नाही.
मी कमजोर पडू नये.
हा माझा प्रयत्न.

तू नेहमीच जिंकत असतोस हे मान्य.
पण म्हणून,
बाकीचे हरतात असे नाही.
मरून सुद्धा न मरणारे आहेतच की इथे.
कसा करशील त्यांचा
पराभव?

हे जीवन पराभूतांसाठी नाही.
हे तूच ठरवतोस
नेहमी.
पण झडप घालून हरलेलयांनाच,
हरवलस तू .
आजपर्यंत.
जे अजिंक्य होते ते कधीच
हरले नाही.
तू जिंकून सुद्धा.

तू सत्य.
तू पूर्णत्व.
तू सॊन्दर्य.
इथवर हेच ऐकत आलोय
तुझ्याबद्दल.
खरंतर तू म्हणजे निव्वळ  फसवणूक.
हे नुकतंच कळलंय मला.
तू नसतोस सत्यासारखा उघड,
पूर्णत्वासारखा सात्त्विक,
सौदर्यासारखा उजळ.
तू असतोस,
बेबंद, अहंकारी अन बेईमान.
एखाद्या हेकेखोर शत्रुसारखा.

माझा तुझ्यावर विश्वास नाही !
तुझ्या जेतेपणावर तर नाहीच नाही !
माझा विश्वास,
जन्मावर,जगण्यावर अन
जीवनावर.
राखेतून उगवणार्या
फिनिक्स सारखा.

असा माथेफिरूंसारख अवतरणं
बंद कर.
यायचंच असेल तर येत चल
अगदी समंजसासारखा.
उन्मत्त अभिमान तर
नकोच इथे.
आलास तर ये अगदी
उत्सव म्हणून.
"नितळ अन् निष्पाप,"
इराद्याने.


नीरज पुरुषोत्तम चौधरी
    09/01/16

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...