Wednesday, 16 October 2019

पाऊस

पावसा रे पावसा रे

पावसा रे पावसा रे
पुरे तुझे हातवारे
तिच्या डोईवर थेंब
तिच्या गालावर चरे

पावसा रे पावसा रे
चिंब झाले रान सारे
श्रावणाच्या सोबतीनं
फिरे गार गार वारे

पावसा रे पावसा रे
तुझे हात जरी कोरे
तुझ्या सालस ओढीनं
सारे कासावीस झरे

पावसा रे पावसा रे
तुझे आसू खरे खुरे
येई विजा कडाडत
ढंग-बिग गुरगुरे

पावसा रे पावसा रे
तुझे बेभान शहारे
भुई येते तरारून
बिगी झेलून फवारे

पावसा रे पावसा रे
पुरे तुझे हात वारे
जरा कोसळ दमान
गातं-बितं 'सहेला रे'

निर्मल नीरज
21/4/2017

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...