त्यांनी त्याला प्रश्न केला
'तू कोण आहेस?'
त्याचा उलटपक्षी प्रश्न
'तुम्ही कोण आहात?'
असे ऐकताच,
उठली त्यांच्या मनात
एक अनपेक्षित ठिणगी.
त्यांना मुकाट्याने
उत्तर देणारा हवा होता
कदाचित..
याला गुलामी नव्हतीच करायची.
प्रश्न एका प्रश्नचा नव्हताच तो
प्रश्न होता त्याच्या अनाम अस्तित्वाचा
आणि हे त्याचं पहिलं पाऊल
एक अनपेक्षित प्रश्न...
एका अनामीकतेच्या विरोधात
एका अस्तित्वाच्या दिशेने..
नीरज पुरुषोत्तम चौधरी
24/03/2017
No comments:
Post a Comment