विस्तार सावल्यांचा
आणिक हे बहाणे
मोजून दावणीला
इतकेच प्रेमगाणेे...
विश्रब्ध चेहर्याचा
आला ऋतू निनावि
मारू कितीक हाका
गाऊ किती तराणे...
अस्फुट सर्द काया
नाही अविट काही
नाही तिची समाधी
नाही तिचे उखाणे...
गपगार सांद्र सारे
हा काळ कोण आहे
नात्यास बंध येथे
कानून कायध्याने...
अस्पष्ट आर्त काही
बोलून होत नाही
बाराखडी नव्यांची
आली बघा नव्याने...
उत्स्फूर्त पारव्यांचा
हुंकार दूरदेशी
झाली अबोल खिडकी
अस्वस्थ तावदाणे...
सारे कसे सरावे ?
नुसते ठसे उरावे
हा दूर कोण जोगी
सूर ताणतो दिवाणे...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
28/02/2017
No comments:
Post a Comment